आठवणींचा प्रवास

0

लोकशाही विशेष लेख

आठवण आणि प्रवास ह्यांत काही फारसा फरक नाहीच, असे मला वाटते. कारण प्रवासातच आठवणींना उजाळा हा मिळत असतो. नकळत का होईना; पण न चुकता सर्वकाही आपल्याला ह्या प्रवासात आठवूनच जाते. मग त्यात तुमची मैत्री असो किंवा तुमचा परिवार असो, ह्या साऱ्या प्रवासात फक्त हेच जास्त आठवतात. काय माहीत काय जादू आहे ह्या प्रवासात फक्त न फक्त आठवनीच आठवतात. कधी रडणारे-हसणारे चेहरे, तर कधी आपुलकीने पाठीवर हात थोपाटून निरोप देणारे चेहरे, तर कधी मस्करीतच थेट पोहचवायला येऊन गळाभेट घेणारे ते चेहरे मनात घर करतात. नाही म्हटलं तरी सर्व गोष्टी ह्या आपल्याशीच जास्त संबंध करतात, परंतु जेव्हा खरा अनुभव हा समोर घडत असतो ना, तेव्हाच आपल्याला त्याची प्रचिती मिळत असते…

माझंही नातं हे प्रवासाशी तस जुनंच आहे. कारण ह्याच प्रवासात मला अनेक लोक भेटली. काही माझ्यासाठी थांबली तर काही अर्ध्यातच सोडून गेली. जे भेटले ते अजूनही मी मनात जपून ठेवलेत आणि जे अर्ध्यातच सोडून गेलेत त्यांनी मला खूप मोठा अनुभव दिला. त्यांच्या ह्या अनुभवामुळेच मी एवढे आज लिहू शकतो. तसेच त्यांच्या आठवणीही कायम हृदयात राहतील ह्यात काही दुरावा नाही.

आठवणींचा वारसा जपत-जपत आज इतका मोठा झालोय की, आज जरी कुणी विचारले तरी, त्या आठवणीला ताजे करण्याची क्षमता माझ्यात आहे, हीच सत्यता.

कधी-कधी वाटते की, ह्या साऱ्या आठवणी जप्त करून ठेवाव्या. कारण कधी कोणती आठवण ह्या प्रवासातून अचानक समोर येऊन जाईल, तर सांगता येत नाही. जुना काही किस्सा जरी आठवला ना, तरी चेहऱ्यावर समाधानीचं हसू आल्याशिवाय राहत नाही; का? तर आपण त्या आठवणी जगलेलो असतो, त्या आठवणींच्या प्रवासामध्ये रमलेलो असतो आणि त्यांना परत-परत आठवत आपण स्वतःला इतकं गुंतवत असतो.. ती आठवण आपल्या मनातून सुटता-सुटत नाही, नि तो “आठवणींचा प्रवास” हा कायमचा आपल्याशी जोडला जातो…

आता फक्त एवढेच ठरवलं आहे की, जेवढा हा प्रवास हा जीवनात शक्य आहे आणि राहणार, तेवढ्या आठवणी मी जोडणार. कारण ह्या आठवणीच अनुभव देतात आणि मगचं आपला प्रवास ही ठरत असतो. ह्याच प्रवासात सारं काही पाहायला, शिकायला नि अनुभवायला मिळत असतं. “कल किसने देखा” ह्या ओळीप्रमानेच “आज जे मिळतं आहे ते आनंदानं जगून घ्यावं” हाच ठरतो मग खरा प्रवास…

विवेक भदाणे
गंगापूरी, अमळनेर
8308152826

Leave A Reply

Your email address will not be published.