माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मागितली दीर्घकाळ रजा…

राज्यसभेतील सर्व पक्ष आणि खासदारांनी दिली एकमताने मंजुरी...

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राज्यसभेतून रजा मागितली आहे. 91 वर्षीय राज्यसभा खासदार मनमोहन सिंग यांची ही विनंती राज्यसभेने मान्य केली आहे. माजी पंतप्रधानांच्या रजेचा विषय गुरुवारी राज्यसभेत गाजला. राज्यसभेतील सर्व पक्ष आणि खासदारांनी एकमताने पंतप्रधानांची रजा मंजूर करण्याचा निर्णय घेतला. सध्या दोन्ही संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे संसदेत येऊ शकत नाहीत. यामुळे त्यांनी राज्यसभेच्या अध्यक्षांकडे काही दिवसांची रजा मागितली आहे.

6 ते 22 डिसेंबरपर्यंत सुटी मागितली

गुरुवारी सभागृहाच्या कामकाजादरम्यान सभापती जगदीप धनखर यांनी ही माहिती सभागृहात मांडली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग प्रकृती अस्वास्थ्यामुळे संसदेच्या या अधिवेशनात सहभागी होऊ शकत नाहीत, असे त्यांनी उपस्थित राज्यसभेतील खासदारांना सांगितले. अध्यक्षांनी सांगितले की, मनमोहन सिंग यांनी 6 डिसेंबर ते 22 डिसेंबरपर्यंत सुट्टी मागितली आहे. मनमोहन सिंग यांनी वैद्यकीय कारणास्तव अधिकृतपणे ही रजा मागितली होती. सभापतींनी गुरुवारी हा प्रस्ताव राज्यसभेसमोर ठेवला आणि सर्व खासदारांनी एकमताने तो मान्य केला. यानंतर माजी पंतप्रधानांची रजा मंजूर करण्यात आली.

माजी पंतप्रधानांना न सांगता राज्यसभेला गैरहजर राहायचे नव्हते

खरे तर आपल्या कामाबाबत नेहमी गंभीर असणाऱ्या मनमोहन सिंग यांना राज्यसभेला न कळवता गैरहजर राहायचे नव्हते. गुरुवारी राज्यसभेत काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आरजेडी, जेडीयू, आप यासह अनेक विरोधी पक्षांच्या खासदारांनी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा करताना घोषणाबाजी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.