साकळी येथील इसमाची भामट्याकडून झाली फसवणूक

0

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क

मनवेल ता.यावल साकळी येथे एका तरुणाची ओटीपीद्वारे फसवणूक, मी आयपीपीबी बँकेतून बोलतोय, तुम्ही आमच्या बँकेचे खातेदार आहात हे निश्चय करण्यासाठी केवायसी करणे आवश्यक आहे. तुमच्या मोबाईल क्रमांकावर जो ओटीपी आला तो पडताळणी करण्यासाठी द्या, बँकेचे व्यवहार सुरळीत रहावेत यासाठी तरुणाने ओटीपी दिल्यानंतर तरुणाला असं लक्षात आले की आपल्या बँक खात्यातून दहा हजार पाचशे रू.एका भामट्याने स्वतःच्या नावे वळती करून फसवणूक केलीआहे.

हा प्रकार तरुणाच्या निदर्शनास आला त्याने पासबुक व्यवहाराचे अद्ययातीकरण केले, तेव्हा त्यांना आपल्या बँक खात्यामधून परस्पर पैसे वळते करण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यांनी बँकेला घडलेला प्रकार सांगितला तरुणाला बँकेकडून फसवणूक झाल्याची माहिती दिली हे कळताच त्यांनी यावल पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात व्यक्तिविरुद्ध तक्रार केली. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.