रोझलँण्डच्या प्रांगणात सुवर्ण पदक प्राप्त विद्यार्थिनीचा गौरव

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

1 मे रोजी ध्वजारोहणाचा कार्यक्रम रोजलँड इंग्लिश मिडियमच्या शिक्षिका शबनम मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून इंग्लिश मिडियमच्या मुख्याध्यापिका तिवारी मॅडम यांच्या हस्ते बाॅक्सीग चॅम्पियन परिणिता कळसकर हिला रोख रक्कम देऊन तिचा गौरव करण्यात आला. व तिच्या पालकांचा सत्कार करण्यात आला, रोझलँण्ड प्राथमिक विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका वंदना सोले मॅडम यांच्या हस्ते वैष्णवी पाटील हिला रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. तसेच तिच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी इंग्लिश व मराठी माध्यमाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.