‘शरद पवारांच्या’ निवृत्ती निर्णयावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; वाचा सविस्तर

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

 

महाराष्ट्राच्या राजकारणात आज अनपेक्षित घडामोड घडली, शरद पवार यांचा अचानक पणे राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदाचा राजाराम देणं कोणालाच अपेक्षित नव्हते. त्यावर आता सर्वांच्या वेगवेळ्या प्रतिक्रिया येत आहे. ‘लोक माझे सांगाती’ या आपल्या राजकीय आत्मकथेच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात पवार यांनी आपला निर्णय जाहीर केला. शरद पवार यांच्या या निर्णयानंतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी सुद्धा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांचा अंतिम निर्णय झाल्यानंतर आपण पुढे काय ते बोलू, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते नागपुरात बोलत होते.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
आता तरी मी एवढेच म्हणेल, हा पवार साहेबांचा वैयक्तिक आणि राष्ट्रवादीचा (Nationalist Party) आंतरिक निर्णय किंवा फैसला आहे. या स्टेजला यावर अधिक बोलणं योग्य होणार नाही. त्यांच्या पक्षातही अनेक मंथन सुरू आहे. त्यामुळे नेमकी परिस्थिती काय आहे, हे लक्षात आल्यानंतरच त्यावर योग्य प्रतिक्रिया देता येईल, असंही फडणवीस म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.