नागाचे घेतले चुंबन अन् अंगाशी आली स्टंटबाजी ! (व्हिडिओ)

0

कर्नाटक, लोकशाही न्यूज नेटवर्क

आजकाल लोकं प्रसिद्धीसाठी काय काय स्टंटबाजी करतील ते सांगता येत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतोय. कर्नाटकातील (Karnataka) व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने नाग (King cobra) पकडलेला दिसत आहे. तो चक्क सापाच्या डोक्यावर चुंबन घेण्याचा प्रयत्न करतो. पण साप अचानक वळतो आणि त्या व्यक्तीला चावतो.

https://twitter.com/HateDetectors/status/1576200565864173568?s=20&t=o5ItFHHqMw3H3iW0tyAA4g

कर्नाटकातील (Karnataka) शिवमोग्गा (Shivamogga) येथे नागाचे चुंबन घेताना एका सर्पमित्राने स्टंट करण्याचा प्रयत्न केला. हा स्टंट त्याला चांगलाच महागात पडला. नागाने (snake) त्याच्या ओठांवर चावा घेतला. अॅलेक्स आणि रॉनी हे सर्पमित्र नाग पकडून जंगलात सोडतात. बुधवारीही त्यांनी तसा प्रयत्न केला. मात्र, यादरम्यान त्याने नागासोबत धोकादायक स्टंट करण्यास सुरुवात केली. हे दोघेही भद्रावतीच्या (Bommanakatte) बोम्मनकट्टे गावाजवळ एका लग्नाच्या घरात दोन साप पकडण्यासाठी पोहोचले होते.

दरम्यान सापाला पकडल्यानंतर अॅलेक्सने नागाचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. पण नागाने त्याच्या ओठाला चावा घेतला. त्यानंतर अॅलेक्सला शिवमोग्गा येथील मॅकगन जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. नागाने चावल्यानंतरही अॅलेक्सने सापांना जंगलात सोडले. आता अॅलेक्स आता व्यवस्थित आहे. त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.