सावधान.. ‘या’ भाज्या फ्रीजमध्ये ठेवताय?, बिघडू शकते तब्येत

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

भाज्या (vegetables) खराब होऊ नयेत म्हणून आपण त्यांना फ्रिजमध्ये (store in fridge) साठवून ठेवतो. कारण त्या ताज्या राहिल्या पाहिजेत. मात्र प्रत्येक भाजी ही फ्रिजमध्ये ठेवता येत नाही, याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होवू शकतो. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या भाज्या फ्रिजमध्ये ठेवू नयेत.

लसूण (Garlic)

अख्खं लसूण किंवा लसणाच्या सुट्ट्या पाकळ्या कधीच फ्रीजमध्ये ठेवू नयेत. फ्रीजमध्ये लसूण ठेवल्यास त्यातील वातावरणामुळे लसणाला अंकुर फुटू शकतात. त्यामुळे लसूण बाहेर मोकळ्या हवेत ठेवावा.

काकडी (Cucumber)

काकडी सुद्धी कधीच फ्रीजमध्ये साठवून ठेवू नये. काकडी जर 10 डिग्री सेल्सियसपेक्षा खालच्या तापमानात ठेवली तर त्याचा वरचा थर वेगाने कुजायला लागतो. आणि त्यामुळे इतर भाज्यांचेही नुकसान होऊ शकते.

बटाटा (Potato)

बटाट्यामध्ये स्टार्च मोठ्या प्रमाणात असते. बटाटा जर फ्रीजमध्ये ठेवला तर त्या स्टार्चचे साखरेत रुपांतर होते. असा बटाट जर मधुमेही व्यक्तींनी खाल्ला तर त्यांच्या रक्तातील साखर वेगाने वाढण्याची शक्यता असते, जे मधुमेही व्यक्तींसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे बटाटा बाहेर, मोकळ्या हवेत ठेवावा.

कांदा (Onion)

कांदाही कधीच फ्रीजमध्ये ठेवू नये. यामुळे कांद्याची कडक होण्याची क्षमता मऊ होते. ज्यामुळे कांद्यामधील नैसर्गिक तत्व संपू लागतात. कडक सूर्यप्रकाश आणि अधिक थंड हवामान यापासून कांद्याचे नेहमी संरक्षण करावे.

Leave A Reply

Your email address will not be published.