Thursday, February 2, 2023

भीषण अपघात.. 26 भाविकांचा जागीच मृत्यू, 28 जण जखमी

- Advertisement -

कानपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूरमध्ये (Kanpur) भीषण अपघात (Accident) झाला आहे. भाविकांनी भरलेल्या ट्रॅक्टरच्या अपघातात 26 भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर 28 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा अकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

नवरात्रीनिमित्त उन्नाव येथील चंद्रिका देवीच्या मंदिरातून (Chandrika Devi temple in Fatehpur) दर्शन घेऊन हे सर्वजण कोरथा गावात परतत असताना ट्रॅक्टर ट्रॉली पाण्याने भरलेल्या शेतात पडली. त्यामुळे ट्रॅक्टरमध्ये अडकलेल्या लोकांचा गुदमरून मृत्यू झाला. तर अनेक गंभीर जखमी झाले, असे जिल्हा दंडाधिकारी विशाक जी अय्यर यांनी सांगितले. मृतांत अनेक जण या महिला आणि मुले आहेत. सार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भादेउना गावाजवळ संध्याकाळी ही घटना घडली, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

तसेच मृतांची संख्या 26 वर गेली आहे. फतेहपूरच्या चंद्रिका देवी मंदिरात प्रवाशांनी “मुंडन” सोहळ्याला हजेरी लावल्यानंतर सुमारे 50 लोकांना घेऊन ट्रॅक्टर-ट्रॉली घाटमपूरकडे निघाली होती, अशी माहिती अय्यर यांनी दिली. दरम्यान सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे