पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

येथील मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालय आणि महाराष्ट्रीय कलोपासक पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेच्या एकांकिकेचे वेळापत्रक अर्थातलॉटस पाडून श्रीगणेशा करण्यात आला आहे. यावेळी नाट्य रसिकांना यानिमित्ताने मेजवानी मिळणार असून एकूण १३ एकांकिकेचे सादरीकरण छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात १० आणि ११ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

दरवर्षाप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पुरुषोत्तम करंडकाने व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून यावेळी या स्पर्धेत जळगाव, धुळे, औरंगाबाद येथील विद्यार्थी आपले कलागुण दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. संभाजीराजे नाट्यगृहात होणाऱ्या या स्पर्धेसाठी मूळजी जेठा महाविद्यालयात लोट्स पाडण्यात आले असून पहिल्या दिवशी ६ आणि दुसऱ्या दिवशी ७ एकांकिका अशा एकूण १३ एकांकिकेचे सादरीकरण होणार असून यावेळी कलाकारांचा मेळा जळगावातील रसिकांना पाहायला मिळणार आहे. यावेळी के.सी.ई. सोसायटीचे सदस्य चारुदत्त गोखले, व्यवस्थापन अधिकारी शशिकांत वडोदकर, कलोपासक पुणे येथील राजेंद्र नागरे, हास्य जत्रा फेम आणि नाट्य विभागप्रमुख प्रा. हेमंत पाटील उपस्थित होते. यशस्वीतेसाठी प्रा. वैभव मावळे, दिनेश माळी आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

या महाविद्यालयांचा समावेश

येत्या १० रोजी डॉ. अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालय, नूतन मराठा महाविद्यालय, गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ फार्मसी, मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव, पु.ओ. नाहाटा महाविद्यालय, कोटेचा महिला महाविद्यालय, भुसावळ. तर ११ रोजी एम.जी.महाविद्यालय, चोपडा, जयहिंद महाविद्यालय, धुळे, पं. जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, धुळे, प्रताप महाविद्यालय, धुळे, देवगिरी महाविद्यालय आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद.

Leave A Reply

Your email address will not be published.