जळगावात उद्यापासून महासांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

0

जळगाव – जिल्हा प्रशासन आणि सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ ते दि. ३ मार्च या कालावधीत महासांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली असून त्यांनी या महोत्सवात गामीण विकास यंत्रणेतर्फे महिला बचतगटांचा सरस महोत्सव देखील होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील लोककलांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने जिल्हा प्रशासन आणि सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ पासून महासांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. दि. २८ रोजी महाराष्ट्राची हास्यजत्रा, दि. २९ रोजी डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शीत आयुष्यावर बोलू काही, दि. १ मार्च रोजी सन्मीता धापटे-शिंदे, चैतन्य कुलकर्णी प्रस्तुत सुरसंस्कृती, दि. २ रोजी महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारा गर्जा सुवर्ण महाराष्ट्र हा कार्यक्रम सादर केला जाणार असून शेवटच्या दिवशी म्हणजेच दि. ३ मार्च रोजी मुंबई साहित्य संघ निर्मीत व उपेंद्र दाते दिग्दर्शित ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच या कालावधीत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे महिला बचतगटांचा विभागीय सरस महोत्सव देखिल होणार आहे. या महोत्सवात २५० स्टॉल सहभागी राहणार असल्याचे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले. यावेळी प्रभारी आरडीसी अर्चना मोरे, ग्रामीण विकास यंत्रणेचे हरीष भोई, यावल वनविभागाचे जमील शेख, अमित माळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.