बंद घर बनावट चावीने उघडून चोरी करण्याचा प्रयत्न

0

जळगाव ;बंद घर बनावट चावीने उघडून चोरी करण्याचा प्रयत्न – शहरातील भवानी पेठ परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी २६ रोजी रात्री १० वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारिया जोझर बदामी (वय-२८, रा. भवानी पेठ, जळगाव ) या राहतात. २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान त्यांचे घर बंद असताना संशयित आरोपी अमजद इकबाल खान (वय-२८ रा.बिलाल चौक तंबापूरा) याने बनावट चावीच्या मदतीने घराचे लॉक उघडून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या बाबत महिलेने सोमवारी २६ फेब्रुवारी रोजी तक्रार दिल्यानुसार आरोपी अमजद इकबाल खान (रा. बिलाल चौक, तांबापुरा) यांच्या विरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास रवींद्र परदेशी हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.