चित्रपट समीक्षकाने मागितली ‘विद्युत जामवाल’कडे लाच

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

अभिनेता विद्युत जामवाल हा सध्या त्याच्या ‘क्रॅक’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचं विद्युतने प्रमोशन केलं. २३ फेब्रुवारीला हा चित्रपट रिलीज झाला. पण या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात झाली आहे. सध्या विद्युत हा त्याच्या एका ट्विटमुळे चर्चेत आहे. या ट्वीटच्या माध्यमातून विद्युतनं एका चित्रपट समीक्षकावर आरोप केला आहे.

विद्युतचं ट्विट
विद्युतन नुकतच एक ट्विट शेअर केलं आहे. या ट्वीटमधून त्यानं एका चित्रपट समीक्षकावर लाच मागितल्याचा आरोप केला आहे. विद्युतनं एक स्क्रिनशॉट ट्विटरवर शेअर केला आहे. या स्क्रिनशॉर्टमध्ये एका चित्रपट समीक्षकाने विद्युतला ब्लॉक केलं आहे, असं दिसत आहे. हा स्क्रिनशॉर्ट ट्विटरवर शेअर करून विद्युतने कॅप्शनमध्ये लिहिलं, “लाच मागणे गुन्हा आहे आणि लाच देणे देखील गुन्हा आहे. मी लाच दिली नाही हा माझा गुन्हा आहे का ?? सध्या विद्युतच्या या ट्वीटची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.