नागपूरमध्ये विविध ठिकाणी बरसल्या पावसाच्या जोरदार सरी

नागपूरमध्ये ५८ वर्षातील विक्रमी पाऊस

0

नागपूर, लोकशाही न्युज नेटवर्क – 
गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस (Rain) बरसला आहे. याच गोष्टीचा अनुभव गुरुवारी नागपूरकरांनी घेतला. नागपूरमध्ये काल सकाळी अक्षरश: पावसाळी ऋतू वाटावा, असे वातावरण तयार झाले होते. त्यानंतर दिवसभर नागपूरमध्ये विविध ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या.

नागपुरात गुरुवारी सकाळी अर्धा तास दमदार पाऊस पडला. हवामान विभागाच्या सकाळी साडेअकरा वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार नागपुरात 47 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. काल सकाळी नागपूरकर जेव्हा जागे झाले तेव्हा निरभ्र आकाश आणि चांगले कडकडीत ऊन होते. मात्र, नऊ वाजता अचानकच वातावरण बदललं आणि काळ्या ढगांनी नागपूरचा आकाश व्यापून टाकले. त्यामुळे साडेनऊ वाजता नागपुरात संध्याकाळ व्हावी, असा अंधार पसरला होता. यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. तब्बल तासभर जोरदार पाऊस झाला.

सकाळी सव्वानऊ वाजल्यापासून सुमारे एक तास नागपुरातील वेगवेगळ्या भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला. काही ठिकाणी झाडाच्या फांद्या तुटून खाली उभ्या असलेल्या दुचाकी आणि वाहनांचा नुकसान झाल्याची ही माहिती आहे. दरम्यान हवामान विभागाने येत्या काही तासांमध्ये पुन्हा नागपुरात मुसळधार पाऊस होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली असून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. नागपूरमध्ये काल सकाळपासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत 50.2 मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. मे महिन्यात गेल्या 58 वर्षातला हा एका दिवसातील सर्वाधिक पाऊस आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.