ब्रेकिंग : सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र सत्तासंघर्षाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सलग तीन दिवस चाललेल्या युक्तिवादानंतर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. या प्रकरणी ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला.

नबाम रेबिया खटल्याचा संदर्भावर युक्तिवाद झाला असून हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे पाठविण्याबाबत निर्णय राखून ठेवला असल्याचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी म्हटले आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा यांच्या घटनापीठासमोर सत्तासंघर्षावर सुनावणी झाली. ठाकरे गटाकडून अ‍ॅड. कपिल सिब्बल, अ‍ॅड. अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला. शिंदे गटाकडून अ‍ॅड. हरीश साळवे यांच्यानंतर अ‍ॅड. निरज किशन कौल आणि अ‍ॅड. महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. हे प्रकरण ७ न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे पाठवा अशी विनंती ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.