खुशखबर ! सोने चांदीच्या दरात मोठी घसरण

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीची भाव वाढतच होते. मात्र आज सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचे चित्र आहे. यामुळे जर सोने – चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी उत्तम संधी आहे. सोन्याच्या भावात आज 430 रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे 16 फेब्रुवारीला मुंबईत 24 कॅरेट सोन्याचे प्रती 10 ग्रॅमसाठीचे दर 56730 रुपये आहेत. तर 22 कॅरेट सोन्यासाठी मुंबईकरांना आज 52 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. 2 फेब्रुवारीला सोन्याचे भाव सर्वोच्च पातळीवर म्हणजेच 58470 रुपयांवर पोहोचले होते. दरम्यान आज मुंबईत चांदीच्या दरात 950 रुपयांची घसरण झाली असून किलोमागे चांदीचे दर 69000 रुपये आहेत.

तर जळगाव शहरातील आजचा सोन्याचा दर 56,100 रुपये आहे तर चांदीचा दर 65,660 रुपये आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.