अखेर खाते वाटपावर शिक्कामोर्तब; यादी राजभवनात सादर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यामध्ये सरकार स्थापन होऊन 40 दिवसांनंतर मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. परंतू अद्याप खातेवाटप जाहीर झालेले नाही. तसेच 15 ऑगस्ट उद्या असताना पालकमंत्र्यांची नियुक्ती झालेली नाही. यापार्श्वभूमीवर आज खातेवाटप जाहीर होऊ शकते. यासंबंधीची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडे पोहोचली आहे, अशी माहिती आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्या स्वाक्षरीनंतर खातेवाटप लवकरच जाहीर होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खातेवाटपावर शिक्कामोर्तब केले असून ही यादी राज्यपालांच्या मंजुरीसाठी राजभवन येथे सादर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही यादी सगळ्यांचे अंदाज चुकवणारे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  शिवसेनेत बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटाने भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन केली. शिंदे-  फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात भाजपकडून 9 तर शिंदे गटाकडून 9 आमदार शपथबद्ध झाले.

शिंदे गटातील मंत्री 

तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील.

भाजपकडून मंत्री

गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील,सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित, मंगलप्रभात लोढा.

Leave A Reply

Your email address will not be published.