महिला संतापली.. ९० सेकंदांत चालकाला मारल्या १७ थप्पड (Video)

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हे प्रकरण नोएडा येथील असून या व्हिडीओमध्ये एक महिला एका रिक्षाचालकाला कानाखाली मारत आहे.  हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून या महिलेच्या कृत्यावर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.

या व्हिडिओत सदर महिला त्या रिक्षाचालकाला मारहाण करत आहे आणि रिक्षाचालक मात्र तेथे निमूटपणे उभा आहे. महिला या चालकाला त्याच्या कॉलरला धरून कारजवळ घेऊन गेली आणि त्याला थप्पड मारण्यास सुरुवात केली. या व्हिडीओमध्ये ही महिला या रिक्षाचालकाला जवळपास १७ थप्पड मारताना दिसत आहे.

नोएडा पोलिसांनी शनिवारी एका महिलेला सार्वजनिक ठिकाणी रिक्षा चालकाला मारहाण केल्याप्रकरणी अटक केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आरोपी महिलेचे नाव किरण सिंह असून ती नोएडा येथील रहिवासी आहे. किरणच्या वॅगन कार आणि रिक्षामध्ये झालेल्या किरकोळ अपघातानंतर ही घटना घडली. ही महिला रिक्षाचालकाला त्याच्या कॉलरने पकडून तिच्या कारवरील अपघाताच्या खुणा दाखवताना दिसत आहे. पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.

यावेळी एका अधिकाऱ्याने सांगितले, “महिला कारमधून खाली उतरली आणि तिने रिक्षाचालकाला अनेकवेळा चापट मारली.” व्हायरल व्हिडीओमध्ये आरोपी महिला केवळ ९० सेकंदात किमान १७ वेळा चालकाला थप्पड मारताना दिसत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.