महापालिका सोडताना महापौर उपमहापौर भावुक…

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

जळगाव महापालिकेच्या लोकनियुक्त प्रतिनिधींची रविवारी दिनांक १७ सप्टेंबर रोजी मुदत संपली. निवडणुकीला अद्याप अवकाश असल्याने प्रशासक म्हणून विद्यमान आयुक्त डॉक्टर विद्या गायकवाड यांच्या नियुक्तीचे आदेश पत्र दिनांक १५ सप्टेंबरला पोहोचले. आज दिनांक १८ सप्टेंबर रोजी प्रशासक पदाची सूत्रे डॉक्टर विद्या गायकवाड स्वीकारतील. दिनांक 17 सप्टेंबरला रविवारची सुट्टी असल्याने शनिवारी दिनांक 16 सप्टेंबर रोजी लोकनियुक्त महापौर जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी पत्रकारांशी वार्तालाप करून आपल्या अडीच वर्षाच्या कारकीर्दीच्या कामाची माहिती दिली. अडीच वर्षांपूर्वी महापौर उपमहापौर यांची निवड झाली तेव्हा राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नेतृत्वात महाविकास आघाडीची सत्ता होती. त्यावेळी नगर विकास मंत्री आजचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे होते. त्यामुळे महापालिकेच्या विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत नव्हता. तशी नगर विकास खात्याकडून पावलेही उचलली गेली. तथापि सव्वा वर्षातच महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिवसेनेत फूट पडली आणि एकनाथ शिंदे चार आमदार घेऊन भाजपशी युती करून स्वतः मुख्यमंत्री बनले. त्यानंतर जळगाव महापालिकेसाठी वाईट दिवस सुरू झाले. सढळ हस्ते शासकीय निधी मिळणार होता त्याला ब्रेक लागला. खुद्द पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महापौर उपमहापौर यांच्यावर शिवसेना गटात प्रवेश करण्यासाठी दबाव तंत्र वापरले आणि निधीसाठी आखडता घेतला. त्यामुळे शासकीय निधी ऐवजी महापालिकेच्या उत्पन्नातून विकास कामे करण्याशिवाय महापौर उपमहापौर यांना पर्याय नव्हता. त्यामुळे जळगाव शहराच्या विकासाला खीळ बसली. तरी सुद्धा महापौर आणि उपमहापौर यांनी न डगमगता महापालिका फंडातून विकास कामे करण्यावर भर दिला. सत्ताधारी भाजप आणि शिंदे गट नगरसेवकांची असहकाराची भूमिका सुरू झाली. स्वतः स्वार्थासाठी भाजप नगरसेवक आयुक्तांवर दबाव तंत्र आणण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचे ते तोंडघशी पडले. आयुक्त विद्या गायकवाड यांचे नगरसेवकांशी लागेबंध असल्याचा आरोप करणारे माजी उपमहापौर अश्विन सोनवणे उघडे पडले. आयुक्तांवरील अविश्वासाचा फज्जा उडाला. भाजप आणि शिंदे गटाच्या नगरसेवकांनी महापौर उपमहापौरांना प्रत्येक बाबतीत खोडा घातला. तरी सुद्धा महापौर आणि उपमहापौरांनी हिम्मत न हारता त्यांच्या कारकिर्दीत अनेक रस्त्यांची कामे केली. काही खात्यांच्या कामाचे कार्यादेश निघाले. पावसाळ्यानंतर त्या रस्त्यांची कामे प्रशासकीय कार्तिकीर्दीत सुरू झाली. विकास कामांबरोबर जळगाव महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला मंजुरी मिळाली होती. परंतु गेल्या दहा वर्षापासून ते पेंडिंग होते. त्याचबरोबर पिंपळा परिसरात शिवस्मारक उभारले. अवघ्या तीन महिन्यात पटेल आणि शिवाजी महाराजांचा पुतळा उभारून त्यांच्या अनावरणाला सत्ताधाऱ्यांतर्फे अनेक प्रकारची अडथळे आणण्यात आली. तथापि महापौर आणि उपमहापौर यांनी त्याला न डगमगता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात त्याचा अनावरण सोहळा करण्यात आला, आणि भव्य अशी उद्धव ठाकरेंची वचनपूर्तीची सभा जाहीर पार पाडली. त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या जळगाव रत्न पुरस्कार सोहळा सुद्धा महापौर उपमहापौरांनी पार पाडला. ही महापौर आणि उपमहापौरांच्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीतील लक्षात राहील अशी कामे म्हणता येईल. महापौर उपमहापौर आणि त्यांच्या टीमने जळगावचे भाजप आमदार यांना विकास कामांना जेरीस आणले. अडीच वर्षाच्या कारकिर्दीत महापौर उपमहापौरांनी जळगावकरांची मने जिंकली आणि आणखी विकास कामे करता आली नाही, याची या दोघांनीही जाताजाता खंत व्यक्त केली. शेवटी जळगावकरांच्या प्रती हे दोघे भावुक झाले होते. महापौर उपमहापौर यांना त्यांच्या आगामी कार्याला शुभेच्छा…!

Leave A Reply

Your email address will not be published.