पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यातील पुणे शहरातील गुन्हेगारी वाढ होत असतांना नुकतेच एका दारूच्या दुकानात तीन जणांनी दरोडा कोयता, सुरगड दाखवत ग्राहकांकडून लूट केली आहे. दरोडेखोरांनी दुकानात घुसताच दुकानाचे शटर बंद केले. तसेच काही काही ग्राहकांना मारहाण देखील केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.
सविस्तर माहितीनुसार, दारूच्या दुकानात नेहमीप्रमाणे ग्राहक दारू पित होते. अचानक तिघेजण आतमध्ये घुसले आणि त्यांनी दमदाटी करण्यास सुरवात करून कुऱ्हाडीचा धाक दाखवून मारहाण करण्यास सुरुवात केली. एकाने हॉटेलमधील ट्रे त्याने ग्राहकांना डोक्यात आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
आधी कोयता गॅंग आणि आता कुऱ्हाड गॅंग सक्रिय झालीये का? अशी भीती पुणेकरांच्या मनात निर्माण झाली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांकडून सध्या आरोपींचा शोध घेतला जात आहे. मात्र सतत घडणाऱ्या या गुन्हेगारीच्या घटनांमुळे पोलीस प्रश्नावरही ताशेरे ओढले जात आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याचा प्रशासनावर दबाव आहे.