सावधान; जळगावातून १४ वर्षीय दोन अल्पवयीन मुलींना पळवले

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरात एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. एका शाळेच्या परिसरातून १४ वर्षीय २ मुलींना पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अनोळखी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे आता जळगाव शहरातील सर्वच पालकांना सावधान राहण्याची गरज सध्या जळगावकरांना आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका मोठ्या महाविद्यालयाच्या परिसरातील शाळेत शिक्षण घेणारी एक १४ वर्षीय ८ महिने व दुसरी मुलगी १४ वर्षे ३ महिने अशा दोन मुलींना दि.२७ डिसेंबर २०२३ रोजी शाळा सुटल्यानंतर अनोखाली व्यक्तीने दोन्ही मुलींना काही तरी फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना जळगावात घडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अनोळखी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एपीआय.रोहिदास गभाले हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.