लोकशाही न्यूज नेटवर्क
चाळीसगाव तालुक्यातील शासकीय भूखंडावरून सर्रासपणे मुरूमची अवैध वाहतूक सुरु आहे. दि 26 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास तालुक्यातील डोण दिगर शिवारातील एम.आय.डी.सी च्या मागे भारत वायर रोप शेजारी सरकारी गट नं 224 मध्ये jcb च्या सहाय्याने 3 डम्पर मुरूम भरताना मिळून आले असून महसूल पाथकाने चारही वाहने पोलीस ग्राउंड मध्ये लावली असून तहसीलदार व प्रांतधिकारी या वाहनांवर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
दि 26/12/23 रोजी खडकी मंडळ अधिकारी गणेश लोखंडे, तलाठी गणेश गढरी, सचिन हातोले, विशाल सोनार, राहुल आल्हाट, निलेश अहिरे यांना तालुक्यातील डोण दिगर शिवारातील एम.आय.डी.सी च्या मागे भारत वायर रोप शेजारी सरकारी गट नं 224 मध्ये (MH 19 CY 6565, MH 19 CY 5251, MH 18 BG 7173 व jcb क्र MH 19 EA 9949) हे विनापरवाना मुरूम उत्खनन करून वाहतूक करताना आढळळून आले. त्यांनी लागलीच सर्व वाहने ताब्यात घेवून चाळीसगाव येथील पोलीस ग्राउंड येथे लावले आहेत.
चाळीसगाव MIDC परिसर व तालुक्यातील शासकीय भूखंडावरून सर्रासपणे मुरूमची अवैध वाहतूक होत आहे. खास करून शासकीय कामे व रेल्वेच्या कामावर रॉयल्टी पेक्षा जास्त प्रमाणात मुरूम ची वाहतूक होत असल्याचे बोलले जात आहे. जे रॉयल्टी ची पावती सोबत ठेवणे गरजेचे असताना अनेक वाहन चालक हे बिनधास्तपणे मुरूम वाहतूक करीत आहेत. महसूल विभागाने पथकात नायब तहसीलदार, पोलीस व महसूल कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून अशा वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.