पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क
पुण्याजवळ कात्रज घाटामध्ये मोठा अपघात झाला असून ५ वाहन एकमेकांवर धडकली आहे. अपघातग्रस्त वाहनांमध्ये एका बसचाही समावेश आहे.
अपघातानंतर बोगद्यातील गाड्या बाजूला काढण्याचे काम सुरु आहे. घटनास्थळी वाहतूक पोलीस दाखल झाले आहे, सध्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागलेल्या आहे. साताऱ्यावरून मुंबईच्या दिशेने गाड्या जात होत्या. त्याचवेळेस बोगद्यात अचानक एका वाहनाने ब्रेक लावल्याने पाठीमागून येणाऱ्या गाड्या एकमेकांवर धडकल्या. या अपघातात एक महिला जखमी झाली आहे.