लोकशाही न्यूज नेटवर्क
बॉलिवूडचा ‘सुलतान’ अर्थात अभिनेता सलमान खान याच्यासाठी २०२३ हे वर्ष पाहिजे तसे खास राहिले नाही. या वर्षात सलमान खानचे चित्रपट मोठ्या पडद्यावर चांगली कामगिरी करू शकले नाही. अशामध्ये या वर्षाच्या शेवटी सलमान खानला मोठा धक्का बसला आहे. सलमान खानबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. मध्यंतरी सलमानने एका पान मसाल्याच्या जाहिरातीमध्ये काम केले होते. याच जाहिरातीमुळे सलमान अडचणीत सापडला आहे. एवढाच नाही तर, हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांना देखील नोटीस बजावण्यात आली आहे.
२०२३ या वर्षामध्ये बॉलिवूडमधील अनेक सेलेब्रिटी हे बऱ्याच वादांमुळे चर्चेत राहिले आहे. यामधील एक प्रकरण म्हणजे पण मसाला जाहिरात, पण मसालाची जाहिरात केल्याप्रकरणी या आधी अक्षय कुमार, अजय देवगण आणि शाहरुख खान यांना नोटीस पाठवण्यात आली होती. अक्षय कुमारने या संदर्भात माफी देखील मागीतली होती. आता पान मसाला जाहिरात केल्याप्रकरणी सलमान खान, हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफला नोटीस पाठवण्यात आली आहे. यांच्यासोबत माजी क्रिकेटपटू कपिल देव, सुनील गावस्कर आणि वीरेंद्र सेहवाग यांनाही कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.