संभाजीनगर येथे पोलीस भरती देणाऱ्या तरुणाने घेतला गळफास

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यभरातील अनेक तरुण शिक्षण घेऊन पोलीस होण्याचे स्वप्न पाहत आहे. पण अनेक तरुणांनी या पोलीस भरती देण्याआधीच आपली जीवनयात्रा संपविल्याचे अनेक उदाहरण आहे. अशीच एक घटना धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज परिसरात घडली आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या १८ वर्षीय तरुणाने अकॅडमीच्या हॉस्टेलमध्ये गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. यात श्रीकांत दशरथ वाढ याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजी नगर जुळ्यातील निपाणी आडगाव गावातील रहिवासी श्रीकांत दशरथ वाढ हा पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी वाळूज एमआयडीसी मधील गरुडझेप करियर अकॅडमीच्या हॉस्टेलमध्ये ११ महिन्यांपासून राहत होता. गुरुवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास त्याने होस्टेलच्या बाथरूममध्ये जाऊन लोखंडी अँगलला कमरेचा बेल्ट बांधून स्वतःला गळफास लावून घेतला. श्रीकांतने इतकं टोकाचं पाऊल का उचललं? याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या घटनेची नोंद वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.