नशिराबाद रस्त्यावर मामा-भाच्याचा भीषण अपघात

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

रामेश्वर कॉलनीतील रहिवासी २५ वर्षीय तरुण त्याच्या भाच्यासोबत नशिराबाद कडून जळगावकडे येत असतांना कर चालकाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात मामा-भाचे हे दोघे जण जखमी झाले. जखमींच्या तक्रारीवरून नशिराबाद पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मुळ अंबालहावे तांडा( ता. जामनेर) येथील रहिवासी गोपाल मोतीराम चव्हाण (वय २५) हे कामानिमित्त जळगावी स्थायिक झाले आहेत. कुटुंबीयांसह मेहरुण रामेश्वर कॉलनीत राहतात.

शनिवारी (दि. २४) रोजी गोपाल चव्हाण व त्यांचा भाचा राधेश्याम अशोक राठोड असे दोघेही नशिराबाद कडून जळगावकडे येत यासाठ त्यांच्या दुचाकी (क्र.एमएच.१९.डी.एच.०५३७) ला राष्ट्रीय महामार्गावरील नशिराबाद नाक्याजवळ जळगावकडून भुसावळकडे सुसाट टाटा नेक्सॉन कार (क्र एमएच.१६.सी.वाय.४२७३) वरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीमध्ये दुर्लक्ष करून मोटसायकलीस समोरून जोरदार धडक दिली.

अपघातात दुचाकीस्वार मामा गोपाल चव्हाण भाचा राधेश्याम राठोड असे दोघेही जखमी झाले. जखमींचा जबाब नोंदविल्यावर नशिराबाद पोलिसात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक अतुल महाजन तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.