पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क
येथील रेल्वे सल्लागार समितीची निवड भारत सरकार अंतर्गत केंद्रीय रेल्वेमंत्री मा.अश्विनी वैष्णव यांचे आदेशाने पाळधी रेल्वे स्टेशन येथील शासकीय सल्लागार समिती सदस्य निवड जाहीर करण्यात आली.
या समितीमध्ये एकूण पाच सदस्य निवड करण्यात आले संदेश झंवर, महेंद्र चौधरी, अधिकार पाटील, मनोहर लंके, कैलास पाटील, यांची नियुक्ती पाळधी रेल्वे स्टेशन येथे बोलण्यात आलेल्या बैठकीत उपस्थित नंदुरबार येथील रेल्वेचे स्पेशल अधिक्षक प्रमोद ठाकूर व पाळधी रेल्वे स्थानक येथील कमर्शियल इन्स्पेक्टर संदीप गुप्ता यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. या समितीच्या माध्यमातून पाळधी रेल्वे स्थानक येथील समस्या व प्रवाशांना येणाऱ्या अडचणी तसेच परिसरातील स्वच्छता व नव्याने काही गाड्यांना तांब्यासाठी प्राधान्य ने प्रयत्न करणार असल्याचे समितीचे सदस्यांनी सांगितले सदर नियुक्ती बद्दल आमदार राजू मामा भोळे भाजपा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर माजी जिल्हा उपाध्यक्ष पी सी पाटील जिल्हा उपाध्यक्ष संजय महाजन भाजपा धरणगाव ता.अध्यक्ष जिजाबराव पाटील ता. उपाध्यक्ष किशोर झंवर तालुका चिटणीस बापू ठाकरे गटप्रमुख प्रकाश ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले,