चाळीसगावात खडकी येथे पिस्तुलाचा धाक दाखवून बँक मॅनेजरला लुटले !

0

चाळीसगाव :;-चाळीसगाव तालुक्यातील गणेशपुर येथील जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेचे मॅनेजरला बंदुकीचा धाक दाखवून १५ हजार रुपयांची रोकड दोन अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याची घटना आज सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तापासाची चक्रे फिरवली आहे. बॅँक मॅनेजरला मारल्याने ते जखमी झाल्याचे वृत्त आहे.

आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास गणेशपूर शाखेवर कामांवर जात असताना खडकी जवळील पुलाचे काम चालू असल्याने डायवर्षण रस्त्यावरील निर्जन ठिकाणी मोटरसायकलवर आलेल्या व तोंडावर रुमाल बांधलेल्या दोन अज्ञात युवकांनी खेळण्यातील बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्या जवळील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला .बॅग मॅनेजर देत नाही म्हणून लूटारूनी त्यांच्या जवळील  लोखंडी रॉडने मॅनेजर यांना जखमी केले व बॅग घेऊन गुन्हेगार पसार झाले यावेळी खडकी बु येथे घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत चाळीसगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.याबाबत चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.