सर्व्हायकल कॅन्सर नक्की काय आहे?

0

लोकशाही विशेष लेख

‘सर्व्हायकल कॅन्सर’ च्या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी प्रसिद्ध मॉडेल – अभिनेत्री पूनम पांडे हिने चक्क स्वतःच्या मृत्यूची बातमी सोशल मिडीयाद्‌वारे पसरवून सर्वांचीच दिशाभूल केली. सोशल मिडियाद्‌वारे तीला बरेच   जण ट्रोल करताना दिसले.

प्रसिद्ध अभिनेत्री पूनम पांडे हिने प्रथम तिच्या पीआर (Public Relation) टिमद्‌वारे इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या मृत्यूची बातमी पसरवली, त्यामुळे बॉलीवूडमधील बरेच कलाकार हळहळ व्यक्त करू लागले. वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी सर्व्हायकल कॅन्सरच्या आजाराने अचानक पूनम पांडेचा मृत्यू होणे म्हणजे धक्कादायक बातमी होती. पण दूसऱ्याच दिवशी पूनम पांडे तिच्या अकाऊंटवरून लाईव्ह येवून ‘मी जिवंत आहे, आज या आजारामुळे कित्येक महिलांचा मृत्यू होत आहे. आणि या सर्व्हायकल कॅन्सर सारख्या आजाराविषयी जास्तीत जास्त जनजागृती व्हावी, म्हणून तिने अशी बातमी लोकांपर्यंत पोहोचवली असे सांगितले.

सोशल मिडीयामधून या आजाराविषयी माहिती पसरवण्यासाठी स्वतःच्या मरण्याचं नाट्य जरी पूनम पांडे हिने केले असले तरी, खरोखरच या आजारावीषयी भारतातील महिलांना फारशी माहिती नाही. जशी हि बातमी सर्वत्र झपाट्याने पसरली तसे या आजाराविषयी गुगलवर लोकांनी माहिती सर्च करण्यासाठी सुरुवात केली.

सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे काय? हा आजार कसा होतो? त्याची लक्षणं कोणती आहेत? आणि या आजारावर कोणते उपचार आहेत? अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे गुगलवर सर्च होऊ लागली. कॅन्सर वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, हे आपल्याला ठाऊक आहेच, पण महिलांमध्ये होणारे कॅन्सर हे आपल्याला फार कमी माहिती आहेत. त्यातल्या त्यात सध्या महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे महिला थोड्या फार प्रमाणात जागरूक झाल्या आहेत. परंतु सर्व्हायकल कॅन्सर बद्दल आपल्याला अजिबातच माहिती नाही किंवा आपण त्याबद्दल जागरूक देखील नाही.

सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे काय?
सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या मुखास (ग्रीवा) होणारा कॅन्सर होय. भारतात दरवर्षी या आजारामुळे १ लाख महिलांमागे ६० हजार महिलांचा या आजारामुळे मृत्यू होत आहे. महिलांमध्ये तोंडाचा कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर होतो आणि त्यासाठी त्या प्रकारचे उपचार देखील आहेत. पण सर्व्हायकल कॅन्सरचे प्रमाण हे (गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर) २०% असून महिलांनी या आजाराबाबत वेळीच जागरूक असलं पाहिजे.

सर्व्हायकल कॅन्सर कशामुळे होतो?
एचपीव्ही (HPV) म्हणजेच व्हूमन पॅपिलोमा व्हायरस Human Papilloma Viruses. हा आजार प्रामुख्याने शारीरिक संबंधातून झालेल्या इन्फेक्शनमधून शरीरात पसरला जातो. सर्व्हायकल कॅन्सर हा एक प्रकारचा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज (Sexually Transmitted Diseases) आहे. जो एकापेक्षा अधिक पुरुषांशी शारीरिक संबंध ठेवल्याने होऊ शकतो. त्याचबरोबर बालविवाह, कमी वयामध्ये लग्न झाल्याने, एका पाठोपाठ अधिक मुलांना जन्माला घालणे, मुलं न होण्याकरिता सातत्याने गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या जातात हे देखील कारण या आजाराला कारणीभूत आहे. एचपीव्ही (HPV) व्हूमन पॅपिलोमा व्हायरस हा असुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्याने गर्भाशयाच्या मुखाशी झालेल्या संसर्गामुळे त्याच्या पेशींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन सर्व्हायकल कॅन्सरची सुरुवात होते.

सर्व्हायकल कॅन्सरची लक्षणे कोणती आहेत?
सर्व्हायकल कॅन्सरच्या विषाणूबाधीत रूग्णाला सुरवातीला काहीच लक्षणं दिसत नाहीत. यासाठी आपली चाचणी करून घेणेच गरजेचे असते. सुरवातीला लक्षणं जाणवत नसली तरी काही लक्षणांकडे आपण दुर्लक्ष करू नये जसे की, व्हाईट डिस्चार्ज नेहमीपेक्षा जास्त होणे, अनियमित पिरियड आणि त्यामध्ये असामान्य होणारा रक्तस्त्राव, ओटीपोटातील दुखणं, असह्य वेदना यातील कोणत्याही तक्रारी असल्यास लगेचच तातडीची उपचार पद्धती सुरू केली पाहिजे. सुरवातीला काही न समजली जाणारी लक्षणं दिसू लागली तर कॅन्सरचे प्रमाण वाढले जाऊं शकते आणि त्यामुळे होणारा त्रास म्हणजे शरीरात अस्वस्थता जाणवते, लघवी करताना जळजळ-वेदना-नियंत्रण न राहणे, अंगावर सुज चढणे, हाडांमध्ये वेदना, अशक्तपणा, वजण कमी होणे अशा प्रकारच्या समस्या वाढत जातात कारण गर्भाशयाच्या मुखाजवळ कॅन्सरचे विषाणू वाढत जातात. यासाठी योग्य डाॅक्टरांच्य मार्गदर्शनाखाली लगेच निदान करून उपचार सुरू केले पाहिजेत. नाहीतर संसर्ग वाढल्याने मृत्यू होऊ शकतो.

सर्व्हायकल कॅन्सरचे उपचार काय आहेत? आणि कसे होऊ शकतात?

‘पॅप स्मियर टेस्ट’
सर्व्हायकल कॅन्सरची लक्षणं निदान करताना आढळून आल्यास प्रथम पॅप स्मियर टेस्ट केली जाते. महिलांनी ही टेस्ट वयाच्या २०-२१ व्या वर्षांपासूनच केली पाहिजे.या टेस्ट नंतर लसीकरण सुद्धा केले पाहिजे. एचपीव्ही (HPV) म्हणजेच व्हूमन पॅपिलोमा व्हायरस Human Papilloma Viruses या लसीकरणामुळे सर्व्हायकल कॅन्सरला आटोक्यात आणता येईल. आणि याचसाठी महिलांमध्ये त्याची जागरूकता वाढवली पाहिजे. ही लस १० ते २६ वर्ष वयोगटातील महिलांपासून ते ४६ वर्ष वयोगटातील महिलांनी घेतली पाहिजे.सर्व्हायकल कॅन्सरच्या उपचार पद्धतींमध्ये केमोथेरपी, रेडिओलाॅजी आणि शस्त्रक्रिया हेच शेवटचे तीन पर्याय उरलेले आहेत. गर्भाशयाच्या मुखावर झालेल्या या आजारामुळे अर्थात सर्व्हायकल कॅन्सरमुळे पीडित महिलांना मुलं होईल अथवा नाही अशी शक्यता दाट असते.

महिलांमध्ये या कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललै आहे, आणि या सर्व्हायकल कॅन्सरपासून वाचयचे असेल, तर नियमितपणे पॅप स्मियर चाचणी करणे अत्यंत आवश्यक आहे. महिलांनी स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष न करता वेळीच रोगाचे निदान केले पाहिजे. लोकसभेतील यावर्षीच्या अर्थसंकल्पातील भाषणांदरम्यान श्रीमती सीतारामन यांनी जाहीर केले की, सरकारने गर्भाशयाच्या मुखाचा (ग्रीवा) कॅन्सरच्या विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींना एचपीव्हि लसीकरण देण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. भारतात या कॅन्सरविरुद्ध लढण्यासाठी एचपीव्ही लसीकरण १४ वर्षापुढील तरुणींना आणि महिलांनाही ही लस घेता येणार आहे. आणि लवकरच त्यासाठी महिला जागरूकता निर्माण करण्यासाठी एचपीव्ही लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे.

अपर्णा स्वप्निल कांबळे-नांगरे
पत्रकार
मो. ९८९२१३८१३२

Leave A Reply

Your email address will not be published.