ब्रेकिंग न्यूज; चाळीसगाव शहरातील ‘पोलिस शुभम आगोणे’ खून प्रकरणी आरोपीस अटक

0

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

चाळीसगाव शहरातील पोलिस शुभम आगोणे खून प्रकरणातील आतापर्यंत फरार असलेल्या, आरोपी सिद्धांत आनंदा कोळी यास चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी अटक केली आहे. संदीप पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून धुळे येथून आरोपीस अटक करून चाळीसगाव येथे आणण्यात आले आहे.

या गुन्हेतील आता पर्यंत सौरभ आंनदा कोळी, वसंत बच्छाव, पृथ्वी कुमावत, चित्रा मोरे, जय मोरे, विष्णू नेवरे, अमोल सिताराम कोळी, राहुल नारायण कोळी या आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर या घटनेतील मुख्य आरोपी आनंदा उर्फ अण्णा कोळी अजूनही फरार आहे. या गुन्हेगारांचा एलसीबी जळगावसह चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे चार तुकड्या शोध घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.