‘एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार

0

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मिशेल योह ; सर्वोत्कृष्ट अभिनेता ब्रेंडन फ्रेझर

लॉस एंजेलिस , लोकशाही न्यूज नेटवर्क

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात आज सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स’ने पुरस्कार पटकाविला . एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स हा चित्रपट ऑस्करसाठी 11 श्रेणींमध्ये नामांकित झाला होता, परंतु यापैकी केवळ 7 श्रेणींमध्ये हा पुरस्कार जिंकण्यात यशस्वी झाला. या एपिसोडमध्ये, या चित्रपटातील मिशेल योह सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, जेमी ली कर्टिस सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री आणि के ही क्वॉन सर्वोत्कृष्ट सहाय्यक आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता जिंकण्यात यशस्वी ठरली. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मिशेल योह तर सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ब्रेंडन फ्रेझर यांनी ऑस्कर पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटातील नाटू-नाटू या गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.द एलिफंट व्हिस्परर्सने सर्वोत्कृष्ट माहितीपट लघुपटने बाजी मारली असून भारताने दुसरा ऑस्कर जिंकला.कार्तिकी गोन्साल्विसने याचे दिग्दर्शन केले आहे. तर गुनीत मोंगा ने निर्मित केला होता.

ऑस्कर विजेत्यांची संपूर्ण यादी

सर्वोत्कृष्ट सिनेमा : एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स (Everything Everywhere All At Once)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : मिशेल योह
सर्वोत्कृष्ट अभिनेता : ब्रेंडन फ्रेझर
सर्वोत्तम दिग्दर्शन : ‘एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अ‍ॅट वन्स’
बेस्ट फिल्म एडिटिंग : ‘एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अ‍ॅट वन्स’
बेस्ट साऊंड – टॉप गन: मेव्हरिक
बेस्ट अ‍ॅडॉपटेड स्क्रीनप्ले : वुमन टॉकिंग
बेस्ट ओरिजनल स्क्रीनप्ले : डॅनियल क्वान आणि डॅनियल शिनर्ट
बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म : द एलिफंट व्हिस्परर्स
बेस्ट विज्युअल इफेक्ट : अवतार-द वे ऑफ वॉटर
बेस्ट ओरिजनल स्कोर : ऑल क्वाईट ऑन दी वेस्टर्न फ्रंट
बेस्ट अ‍ॅनिमेटेड शॉर्ट फिल्म : द बॉय, द मोल, द फॉक्स आणि द हॉर्स
बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म : द एलिफंट व्हिस्पर्स
सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म : ऑल क्वाईट ऑन दी वेस्टर्न फ्रंट
सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार : ब्लॅक पँथर
सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टाइल – द वेल
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी : जेम्स फ्रेंड
सर्वोत्कृष्ट लाइव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट फिल्म : आयरिश गुडबाय
बेस्ट डॉक्यूमेंट्री फिचर फिल्म : नवलनी
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : अभिनेत्री जेमी ली कर्टिस
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : के हुई क्वान
सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड शॉर्ट फिल्म : पिनोकियो

Leave A Reply

Your email address will not be published.