पारोळा तालुक्यातील हिवरखेडा धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

पारोळा तालुक्यातील मोंढाळे हिवरखेडा परिसरात गेल्या पंधरा दिवसापासून धुमाकूळ घालणारा बिबट्या वनखात्याने अखेर काल रात्री साडेआठच्या सुमारास जेर बंद केला. दिनांक ८, बुधवारी रात्री पुन्हा एका वासराचा फडशा हिवरखेडा परिसरात पडला. आणि गावकऱ्यांची पुन्हा धावपळ उडाली. परंतु वनखात्याचे अधिकारी विवेक होसिंग उपवनसंरक्षक जळगांव व सहय्यक वनसरक्षक एस.के.शिसव यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल पारोळा एस. बी.देसले यांनी वन्यजीव वनरक्षक व संरक्षण मजूर यांच्या सहकार्याने या परिसरात सापळा रचून व या परिसरात गस्त घालून, पिंजरा लावला व अखेर बिबट्यास जेरबंद केले. आणि परिसरातील ग्रामस्थांनी मोकळा श्वास घेतला या कामी ग्रामस्थांनी त्यांना सहकार्य केले. वरिष्ठांच्या आदेशाने बिबट्यास त्याच्या अधिवासात सोडण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.