भडगाव शहरासह तालुक्यात अवैध वृक्षतोड

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यातील संरक्षित वन परिसर व रस्त्याकडील झाडांची तोड करण्यात येत आहे. अवैधरित्या तोडलेले हे लाकूड दररोज सायंकाळी पाचनंतर २० ते २२ ट्रॅक्टरमधून शहरातील विट भट्टी व सॉमिलवर आणले जात आहे. शहर व तालुक्यात अनेक वैध व त्यापेक्षाही जास्त अवैध सॉ मिल व विट भट्टा सुरू आहेत. लाकडाच्या व्यवसायात मोठा नफा असल्याने शहर व तालुक्यात अवैध वृक्ष तोड करणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत. या टोळ्या तालुक्यातील पाचोड रोड, वाक् रोड, चाळिसगाव रोड, बाजार समिती समोर, वलवाडी, व कजगाव, कोळगाव रस्त्यावरील वन संरक्षित भाग, रस्ताकडेची झाडे तोडत आहेत. हे लाकूड ट्रक्टर ट्रॉलीत भरून ठेवले जाते, भर दुपारी व सायंकाळी या ट्रॉली सर्रास शहरात आणल्या जातात. विट भट्टी, सॉ मिल चालक कोणतीही चौकशी न करता या लाकडाची कटाई करून देतात, अशी माहिती मिळाली आहे. संरक्षित वन परिसरातील वृक्षाचे रक्षण करणे व अवैध वृक्षतोड थांबवणे, अवैध लाकूड वाहतुकीवर कारवाई करणे वनविभाग व पोलिस यांच्याकडून अपेक्षित आहे. या दोन्ही विभागांचे दुर्लक्ष होत आहे.

माहिती मिळताच कारवाई करतो

वृक्षतोड, रस्त्याकडेला उभ्या राहणाऱ्या लाकडाने भरलेल्या ट्रॉली व शहरात येत असलेले लाकूड याबद्दल वनक्षेत्रपाल मुलाणी व नाकेदार मुकेश बोरसे यांच्याकडे विचारणा केली. त्यावर त्यांनी ‘माहिती मिळताच कार्यवाही करतो’ असे उत्तर दिले. तरी वनक्षेत्रपाल श्री.मुलाणी. व नाकेदार मुकेश बोरसे यांनी दिवसा गस्त व रात्र गस्त (पेट्रोलिंग) करत असताना तालुक्यातील विट भट्ट्या व स्वामिल येथे पडलेले ओले साग, निंब, आंबा व इतर मोठे लाकूड यांचे पंचनामे करून सरळ हाताने ट्रॅक्टर व मालकावर गुन्हे दाखल करून कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.