पारोळा नगर परिषदेच्या वाढीव नवीन भाडे व घरपट्टी आकारणीला शासनाची स्थगिती

0

पारोळा , लोकशाही न्यूज नेटवर्क
पारोळा नगरपालिके ने घरपट्टीत वाढ तसेच व्यापारी भूखंड व दुकानांचे नवीन दुप्पट भाडे व कर आकारणी यास महाराष्ट्र शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे.

याबाबत याबाबत अधिक माहिती अशी की मागील चार महिन्यापासून पारोळा शहरातील व्यावसायिक व नागरी वातावरण नवीन वाढीव कर व दुप्पट भाडे वाढ यामुळे नागरिक व व्यापारी चांगले च त्रस्त झाले होते. या दुप्पट भाडे वाढ व नवीन घरपट्टी आकारणीने नागरिक व व्यापारी हतबल झाले होते. त्याकरिता व्यापारी व काही ज्येष्ठ नागरिक माजी उपनगराध्यक्ष डॉ. मंगेश तांबे यांच्याकडे आपली कैफियत घेऊन गेले असता डॉ, मंगेश तांबे यांनी पारोळ्याचे आ, चिमणराव पाटील यांच्या, ही समस्या लक्षात आणून दिली. सदरहू समस्या सार्वजनिक व नागरी असल्यामुळे याबाबतची याचिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दाखल करण्यात आली. त्यावरून नगरपरिषद प्रशासनास मुख्यमंत्री यांनी निर्देश देऊन सदर कर वाढ व भाडेवाढ ही तात्पुरता थांबवून घ्यावी. असे आदेश दिले आणि नगरपरिषद अधिनियम १९६५ चे कलम ११४ च्या तरतुदींना आधीन राहून निर्णय घ्यावा. आणि तसा अहवाल सादर करावा. या आदेशामुळे सदर नगरपरिषदेने केलेली करवाढ व दुप्पट भाडेवाढ यास स्थगिती मिळाली आहे. हे आदेश महाराष्ट्र शासनाच्या सह आयुक्तांनी पारित केलेले असून तशा सूचना पारोळा मुख्याधिकारी तथा प्रशासक यांना दिल्या आहेत. सदरहू कार्यवाहीत माजी उपनगराध्यक्ष डॉ.मंगेश तांबे यांनी दाखवलेली कार्यतत्परता आणि आमदार चिमणराव पाटील यांनी मुख्यमंत्री यांच्या पर्यंत हा विषय घेऊन नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेला प्रयत्न यामुळे शहरातील नागरिक व व्यापारी यांनी समाधान व्यक्त करीत आहेत.व आमदार चिमणराव पाटील यांचे तसेच नगरसेवक डॉ मंगेश तांबे यांचे शहरवासीयांनी आभार मानले.

जिल्हाधिकारी यांनी नेमली त्रिसदस्यीय समिती
पारोळा नगरपालिकेच्या वाढिव घर पट्टी व दुप्पट भाडेवाढ यास शासनाच्या वतीने स्थगिती देण्यात आली असून त्या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी त्रिसदस्यीय समिती नेमली असून यात प्रांताधिकारी हे अध्यक्ष असून पारोळा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक ज्योती भगत पाटील ह्या पदसिद्ध सदस्य तर सहाय्यक संचालक नगररचना विभाग हे सदस्य असणारं आहेत अशी त्रिसदस्यीय समिती नेमली असून आता हि समिती काय निर्णय घेते याकडे शहरवासीयां सह व्यापार्यांचे लक्ष लागून आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.