तरुणीवर अत्याचार ; गर्भपात करून लग्नास नकार ; तरुणावर गुन्हा

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

एका तरुणीला लग्नाचे खोटे आमिष देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून अत्याचारातून तरुणी गर्भवती राहिल्याने गर्भपात करूनही तरुणाने लग्नास नकार दिल्यानंतर सदर तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील एका भागात १८ वर्षीय तरूणी ही राहत असून एरंडोल शहरातील इस्लामपूरा भागात राहणारा हसन असलम मोमीन याची पिडीत मुलीशी ओळख झाली, त्यावेळी ती अल्पवयीन होती. ओळखीचा फायदा घेत तिला लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर तिच्या इच्छेविरूध्द अत्याचार केला. या अत्याचारातून पिडीत तरूणी गर्भवती राहिल्यानंतर संशयित आरोपी हसन असलम मोमीन, त्याची आई मुन्नी आणि असलम मोमीन या तिघांनी गर्भपात करण्यासाठी कॉफी आणि पपई खाऊ घातली. यामुळे तिचा गर्भपात झाला. त्यानंतर तिच्याशी लग्न करण्याची तारीख निश्चीत केली. परंतू लग्नाच्या वेळी हजर न झाल्याने फसवणूकझाल्याचे लक्षात आल्याने तरूणीने रविवारी १२ मार्च रोजी रात्री ११ वाजता रामानंदनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. संशयित आरोपी हसन असलम मोमीन, त्याची आई मुन्नी आणि असलम मोमीन या तिघांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाले करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.