बंद घराचे कुलूप तोडुन ३३ हजारांचा मुद्देमाल लंपास

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

आसनखेडा ता. पाचोरा येथे बंद घराचे कुलूप तोडुन घरात प्रवेश करत अज्ञात चोरट्याने कपाटातील २० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व १३ हजार रुपये रोख असा ३३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत प्राप्त माहिती अशी की, आसनखेडा ता. पाचोरा येथील रहिवासी सुभाष त्रंबक पाटील हे त्यांच्या पत्नी विमलबाई सुभाष पाटील यांच्यासह दि. १ फेब्रुवारी पासुन पुणे येथे मुलाकडे गेले होते. दरम्यान दि. ६ फेब्रुवारी सुभाष पाटील यांच्या भावाचा फोन आला की, तुमच्या घराचे कुलूप तुटलेले आहे. माहिती मिळताच सुभाष पाटील व विमलबाई पाटील यांनी आसनखेडा गाठले. घरात प्रवेश करुन पाहणी केली असता घरातील कपाटात ठेवलेले २० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे बाजुबंद व १३ हजार रुपये रोख असा एकुण ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळुन आला नाही. त्यानुसार विमलबाई सुभाष पाटील यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आला आहे.

घटनेचा पुढील तपास पो. नि प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ मुकुंद परदेशी हे करीत आहे. तसेच सुभाष पाटील यांच्या घराच्या शेजारी राहणारे नाना महादु पाटील हे देखील मुक्ताईनगर येथे गेले असता त्यांचे देखील घराचे कुलूप तुटलेले आढळुन आले आहे. मात्र त्यांचे घरातुन काहीही चोरीस गेलेले नाही. यामुळे आसनखेडा परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.