शिक्षण सेवकांसाठी सरकारची गोड बातमी…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

सरकारने शिक्षण सेवकांसाठी एक गोड बातमी दिली आहे. राज्य सरकारने (Government of Maharashtra ) शिक्षण सेवकांच्या मासिक मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. सरकारकडून याबद्दलचा जीआर प्रसिद्ध करून मानधनात वाढ करत असल्याची घोषणा केली आहे. शिक्षण सेवकांच्या मानधनात झालेली वाढ 1 जानेवारी 2023 पासून लागू होणार आहे.

शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ व्हावी, यासाठी शिक्षक संघटना आणि शिक्षण सेवकांकडून वेळोवेळी मागणी केली जात होती. या मागणीनुसार लोकप्रतिनिधींनी अनेक वेळा मानधन वाढीचा मुद्दा विधिमंडळात चर्चेसाठी घेतला होता. उच्च न्यायालयाने देखील एका निवाड्यात निकाल देताना शिक्षण सेवकांच्या अल्पशा मानधनाविषयी आश्चर्य व्यक्त केले होते. अखेर आज जीआर काढून शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.

या निर्णयानंतर प्राथमिक आणि उच्च प्राथमिकच्या शिक्षण सेवकांचं मानधन 6 हजार रुपयांवरुन 16 हजार रुपयांवर नेण्यात आलं आहे. माध्यमिकच्या शिक्षण सेवकांचं वेतन 8 हजार रुपयांवरुन 18 हजार रुपये करण्यात आलं आहे. तर उच्च माध्यमिक महाविद्यालयातील शिक्षक सेवकांचं वेतन नऊ हजार रुपयांवरुन 20 हजार रूपये करण्यात आलं आहे. राज्य शासनाकडून आजच याबाबतचा जीआर काढण्यात आला आहे. 22 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाचा आज राज्य सरकारकडून जीआर काढण्यात आला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.