शेतात विजेचे कनेक्शन देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागणारा तंत्रज्ञ जाळ्यात

0

जळगाव;- चोपडा तालुक्यात देवगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतात विजेचे कनेक्शन देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागणारा महावितरण कंपनीचा वरिष्ठ तंत्रज्ञ याला जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली असून यामुळे परिसरात खळबळ उडाले आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की धानोरा ता. चोपडा येथील वरिष्ठ तंत्रज्ञ अनिल शंकर राठोड यांनी तक्रारदाराच्या पत्नीच्या नावाने असलेल्या देवगाव शिवारात शेत गट नंबर 330 मध्ये शेतात तीन फेज मोटर साठी तक्रारदार यांनी विजेचे त कनेक्शन घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता . मात्र संशयित अनिल राठोड याने या कामासाठी चार हजार रुपये द्यावे लागतील असे मागितले . मात्र तडजोडीअंती तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना आज अनिल राठोड यांना एसीबीच्या पथकाने सापळा रचून अटक केली . याबाबत अडावद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल काम सुरु होते.

यांनी केली कारवाई

हा सापळा जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख, पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव, पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, बाळू मराठे, अमोल सूर्यवंशी, सचिन चाटे तसेच एएसआय दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, रवींद्र घुगे, किशोर 9महाजन, सुनील वानखेडे, प्रदीप पोळ, राकेश दुसाणे, प्रणेश ठाकुर आदींच्या पथकाने यशस्वी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.