लोकशाही न्यूज नेटवर्क
खेळण्या-खेळण्यात चिमुकल्याचा अंत झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फुग्यामुळे चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशमधील अमरोही येथे घडली. घडलेल्या प्रकारानंतर त्याच्या कुटुंबीयांनी चिमुकल्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
फुग्यासोबत खेळणे बेतले जीवावर
या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. चिमुकल्याला रुग्णालयात नेण्याआधीच त्याने जीव सोडला होता. फुगा फुगवत असतांना अचानक तो फुटला आणि याचा तुकडा चिमुकल्याच्या तोंडातून श्वसननलिकेत जाऊन अडकला. यानंतर चिमुकल्याचा श्वास गुदमरला आणि त्याला अस्वस्थ वाटू लागलं. कुटुंबियांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी त्याला रुग्नालयात दाखल केले. पण त्याआधीच त्याने प्राण सोडले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील गजरौला येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. मृत बालकाचं वय १० वर्ष होते. गुरुवारी चिमुकला घराबाहेर इतर मुलांसोबत खेळत होता. यावेळी त्याने तोंडाने फुगा फुगवण्यास सुरुवात केली. फुगा फुगवतांना तो फुटला आणि त्याचा तुकडा त्या चिमुकल्याच्या तोंडात गेला. फुगा घशात अडकल्याने त्याला त्रास होऊ लागला. त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्यानंतर तो बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला.
त्यानंतर एकत्र खेळणाऱ्या मुलांनी ही बाब चिमुकल्याच्या कुटुंबियांच्या कानावर टाकली आणि एकच खळबळ उडाली. त्यांनी मुलाला घेऊन परिवाराने धाव घेतली. पण, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.