पत्नीच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंटवर बदनामी ; पतीची आत्महत्या

0

जामनेर : –– बनावट इन्स्टाग्राम खात्यावर पत्नीच्या नावाने चारीत्र्याबद्दल बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध झाल्याने व त्याबाबत सातत्याने इतर व्यक्तींकडून विचारणा होत असल्याने या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या अज्ञात इन्स्टाग्राम धारकाविरोधात जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

जामनेर तालुक्यातील एका गावातील विवाहितेच्या नावाने कुणीतरी बनावट इन्स्टाग्राम खाते तयार केले. त्यावर मला कधीही फोन करा, माझा नंबर … असून या शिवाय अन्य बदनामीकारक मजकूर टाकून तो प्रसिद्ध करण्यात आला. सोशल मिडीयावरील या मजकुराबाबत विवाहितेसह तिच्या पतीला मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला. सतत नागरीक बदनामीकारक मजकुराबाबत विचारणा करू लागल्याने त्यास कंटाळून विवाहितेच्या पतीने 9 डिसेंबर रोजी आत्महत्या केली. आपल्या पतीच्या आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या अज्ञात इन्स्टाग्राम खातेधारकाविरुद्ध जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास जामनेर पोलिस स्टेशनचे हवालदार अतुल पवार करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.