लोकशाही न्यूज नेटवर्क
जर तुम्ही १८ वर्षांचे असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. या वयात अनेक जण कार्ड तयार करतात. आतापर्यंत उद्धार कार्ड काढण्याची प्रक्रिया सोपी होती. आधार केंद्रावर जाऊन, बायोमॅट्रिक पद्धतीने पालन केले की, आधार कार्ड घरपोच मिळत होते. पण आता नियमात बदल करण्यात आला आहे. आधार कार्डविषयी एक अपडेट समोर आली आहे. नवीन नियमानुसार, पहिल्यांदा आधार कार्ड तयार करायचे असेल तर नागरिकांना परपोर्ट विषयी जशी पडताळणी प्रकिया पूर्ण करावी लागते, तशी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
नियमात लवकरच बदल
मीडिया रिपोर्टनुसार, एका अधिकाऱ्याने या बदलाविषयी माहिती दिली आहे. पासपोर्ट काढण्यासाठी व्हेरीफिकेशन करावे लागते. आता आधार कार्डसाठी सुद्धा हीच प्रक्रिया लागू करण्यात येणार आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्रदूकरण नाही तर, राज्य सरकार त्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करणार आहे. राज्य सरकार त्यासाठी जिल्हा प्रशासनातील अथवा उपविभागीय अधिकाऱ्याला नोडल अधिकारी म्हणून अथवा अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी नामनिर्देशित केले जाऊ शकतात.