यावल शहरातील तोतया डॉक्टरला अटक

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

यावल तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असतांना आज यावलमध्ये तब्बल दहा वर्षांपासून पदवी नसतांनाही रूग्णांची आर्थिक लूट करणार्‍या मुन्नाभाई डॉक्टरच्या विरूध्द यावल पोलीसानी कारवाई केली.

यावल तालुक्यात बहुतांश गावांमध्ये बंगाली डॉक्टरांचा धुमाकूळ सुरू असून कोणतीही डिग्री व अधिकृत परवाना नसतांना ते रूग्णांच्या जीवाशी खेळत असून त्यांची आर्थिक लूट करत असल्याचे वृत्त दैनिक लोकशाही मध्ये प्रसारीत झाले होते

यावलमधील अशाच एका बोगस डॉक्टरच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या
शहरात गेल्या दहा वर्षापासुन औषध उपाचाराच्या नावाखाली रूग्णांची आर्थिक लुट करणार्‍या बंगाली बिजनकुमार नियमाइचंद राय नावाच्या व कोलकत्ता (पश्चीम बंगाल) येथील मूळ रहिवासी असणार्‍या बोगस डॉक्टरच्या विरूध्द आज कारवाई करण्यात आली. या प्रकरणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजु तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली व तक्रारकर्ता यावल तालुका मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. त्या बोगस बंगाली डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले असुन, या संदर्भात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रसंगी डॉ. रमेश पाचपोळे, डॉ धीरज पाटील, डॉ तुषार फेगडे, डॉ गणेश रावते, डॉ मनोज वारके, डॉ. दाऊद खान, डॉ ईमरान शेख, डॉ. कुंदन फेगडे, डॉ सतिष अस्वार आदींची उपस्थिती होती. दरम्यान, यावलमधील अवैध बंगाली डॉक्टरला अटक करण्यात आली असली तरी तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये ठाण मांडून बसलेल्यांवर कधी कारवाई होणार ? हा प्रश्‍न आता विचारण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.