धक्कादायक; पुण्यातील कोथरूड मधून दोन दहशदवाद्यांना अटक

घरात सापडलेल्या चिठ्ठीवरून धक्कादायक माहिती उघड

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

पुण्यातील कोथरूड (Kothrud) येथून काही दिवसांपूर्वी दोन दहशदवाद्यांना ताब्यात घेण्यात आलं असून, सध्या एटीएसकडून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. या तपासात मोठी माहिती समोर येत आहे. दहशतवाद्यांच्या घरात लवपवलेला एक कागद सापडला आहे. या कागदात एटीएसला धक्कादायक माहिती मिळाली आहे. हा कागद फॅनमध्ये लपवलेला असून, कागदावर बॉम्ब बनविण्याची प्रक्रिया लिहिण्यात आली होती.

बंदुकीच्या गोळ्या जप्त

ॲल्युमिनीअम पाईप, बल्बच्या फिलॅमेंटस आणि दोन बंदुकीच्या गोळ्या देखील या ठिकाणी सापडल्या आहेत. या दोघांनी सातारा, कोल्हापूर या जिल्ह्याच्या जंगलांमध्ये जाऊन बॉम्बस्फोट घडविण्याची चाचणी केली होती. अशी माहिती एटीएसने दिली आहे.

१८ जुलै रोजी पुण्यातील कोथरूड भागात दुचाकी चोरत असतांना हे दोन अतिरेकी सापडले होते. यानंतर पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता, पोलिसांना त्यांच्या घरातून काही संशयास्पद वस्तू केल्या होत्या. तसेच दोघांना अटक करण्यात आली होती.

२५ जुलै रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात या दोघांना हजर करण्यात आले होते. त्यावेळी या दोघांनी पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोट चाचणी केल्याची माहिती एटीएसने न्यायालयात दिली होती. त्यांनतर तपासात आता बॉम्ब बनवण्याचा कागद देखील सापडला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.