यावल येथील ३२ वर्षीय विवाहितेचा १५ लाखांसाठी छळ

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

यावल तालुक्यातील हिंगोणा येथील माहेर असलेल्या ३२ वर्षीय विवाहितेचा १५ लाखांची छळ करण्यात आला. मूलबाळ होत नसल्याने वाटेल ते बोलत पतीसह पाच जणांनी विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात पाच जणांविरद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

हिंगोणा येथील माहेरी असलेल्या भाग्यश्री सुदर्शन गिरासे (वय ३२) यांनी फैजपूर पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार त्यांचा विवाह सन २०१९ मध्ये सुदर्शन अशोक गिरासे यांच्यासोबत झाला होता. विवाहानंतर पती सुदर्शन गिरासे, सासू प्रमिला गिरासे, मिनल संदीप राजपुत, पायल छत्रपाल राजपूत व प्रकाश गोरख राजपूत या पाच जणांनी छळ केला. लग्नात मिळालेले दागिने काढून घेत माहेरी पाठवून दिले. पुढील तपास हवालदार देविदास सूरदास करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.