‘ताली’चा ट्रेलर रिलीज, ‘या’ दिवशी होणार वेब सिरीज होणार रिलीज

सुष्मिता दिसणार श्री. गौरी सावंत यांच्या भूमिका

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

सुष्मिता सेन (Sushmita Sen) बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. कधी तिच्या आरोग्याला घेऊन, तर कधी तिच्या पर्सनल लाईफला घेऊन. सुष्मिताने आपल्या चाहत्यांना सौंदर्याने आणि तिच्या अभिनयाने वेड लावले आहे. सुष्मिताच्या मोस्ट अवेटेड वेब सिरीजची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहे. तृतीयपंथीय कार्यकर्त्या श्री.गौरी सावंत (Mr. Gauri Sawant) यांच्या आयुष्यातील बरेच पैलू आपल्याला हा वेब सिरीजमधून बघायला मिळणार आहे.

अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर टीझर शेअर करतांना कॅप्शनमध्ये लिहले की, “गाली से ताली तक के सफर की ये कहानी। पेश है भारत के तीसरे लिंग के लिए श्रीगौरी सावंत की लड़ाई की कहानी।’

१५ ऑगस्टला येणार भेटीला
अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सुष्मिताचा दमदार अभिनय पाहायला मिळाला. सुष्मिताच्या कपाळावर मोठी बिंदी आणि साडी नेसलेली दिसत आहे. तिला आयुष्यात तीन गोष्टी हव्या आहेत असं ती म्हणते. स्वाभिमान, सन्मान आणि स्वतंत्र म्हणजे स्वातंत्र्य. ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत सुष्मिताने चाहत्यांना खूप प्रभावित केले आहे. ही सिरीज स्वातंत्र्य दिनानिमित्त 15 ऑगस्ट रोजी OTT प्लॅटफॉर्म Jio Cinema वर प्रदर्शित होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.