उधारीचे पैसे न दिल्याच्या रागातून शेतकऱ्याचे ठोसा मारून दोन दात पाडले

0

चाळीसगाव;- उधार घेतलेले पन्नास हजार रुपये एक महिन्यानंतर देतो असे सांगितल्यावरही समोरच्याला राग आल्याने त्याने एका शेतकऱ्याच्या तोंडावर जोरदार ठोसा मारून त्याचे दोन दात पाडून पट्ट्याने पाठीवर व हाता पायावर मारहाण करून चापटा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार तालुक्यातील चाळीसगाव कन्नड रोडवरील कांचन ढाबा येथे घडला असून याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की सांगवी तालुका चाळीसगाव येथील शेतकरी देविदास छबा चव्हाण वय 52 यांनी संशयित राजू बाबू राठोड साहेबराव बाबू राठोड ररा. तळोदे प्रचा या दोघांकडून पन्नास हजार रुपये उसनवार घेतले होते. 28 जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास चाळीसगाव कन्नड रोड वरील कांचन ढाबा येथे संशयित आले असता त्यांना देविदास चव्हाण यांनी पन्नास हजार रुपये एक महिन्यानंतर देतो याचा राग आल्याने राजू राठोड याने देविदास चव्हाण यांच्या तोंडावर जोरदार ठोशाने प्रहार करून त्यांचे पुढील दोन दात पाडले. तसेच त्यांच्या पट्ट्याने त्यांच्या हाता पायावर आणि पाठीवर मारहाण केले. तसेच साहेबराव राठोड याने चाप्टा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. प्रकरणी देविदास चव्हाण यांनी 29 जुलै रोजी दुपारी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र साळुंखे  करीत  आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.