जळगाव जिल्ह्यात येत्या दोन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता

0

जळगांव:- शहरासह जिल्ह्यात गेल्या आठवड्यात सलग एक तीन दिवस जोरदार पाऊस झाला होता. यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाले. अद्याप शहरात सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला आहे. दरम्यान, पुढील दोन दिवसांत अचानक  मुसळधार पाऊस येण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस येऊ शकतो. जिल्ह्यातही सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. दरम्यान, शनिवारी शहरात दिवसाही रिपरिप पाऊस झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.