चाळीसगाव येथे शेतकऱ्याच्या घरावर डल्ला; रोकडसह दागिने लांबविले

0

चाळीसगाव;- तालुक्यातील रांजणगाव येथे एका शेतकऱ्याच्या घराचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करून कपाटातील लॉक तोडून आतील रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख 41 हजारांचा ऐवज लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला असून अज्ञात चोरट्या विरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की तालुक्यातील रांजणगाव येथील शेतकरी साहेबराव राजधर सूर्यवंशी वय 64 यांच्या बंद घराचे दरवाजाचे तोडून हात प्रवेश करून आज्ञा चोरट्यांनी 28 जुलै रात्री साडेदहा ते 29 जुलै रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत कपाटातील 80 हजार रुपयांची रोकड ,तीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातील डोंगल, तीस हजार रुपये किमतीचे पोत, पंधराशे रुपयांचे चांदीचे बेले असा एकूण एक लाख 41 हजार पाचशे रुपयांचा याप्रकरणी साहेबराव सूर्यवंशी यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून 29 जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक लोकेश पवार करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.