कारच्या धडकेत दुचाकीस्वारांचा मृत्यू

0

चोपडा : – धानोरा गावाकडून चोपड्याकडे भरधाव वेगाने येणाऱ्या हुंदाई कंपनीच्या चारचाकी व चोपड्याकडून धानोऱ्याकडे जाणाऱ्या दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. यात तालुक्यातील पारगाव येथील नितीन पाटील व चेतन पाटील या दोघा दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याची घटना ७ रोजी दुपारी ४.३० वाजता घडली.

या दुर्दैवी घटनेमुळे तालुक्यात शोककळा पसरली आहे. तालुक्यातील पारगाव येथील रहिवासी नितीन रमेश पाटील (वय ३८) व चेतन निंबा पाटील (वय २५) हे चोपड्याहुन पारगाव येथे घरी जात होते. दुपारी साडेचार वाजता धानोऱ्याकडून चोपड्याकडे भरधाव वेगात येणारी हुंदाई कंपनीच्या क्रेटा गाडी (एमएच ०४, जेएम- ३३८८) ने या तरुणांच्या दुचाकी (एमएच १९, एएम दिली.

यात रतन उर्फ नितीन रमेश पाटील वस्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह आरसीपी प्लाटून आणि बीएसफची तुकडी घटनास्थळी दाखल झाली. परंतु नातेवाईक मृतदेहाला हात लावू देत नव्हते. त्यांनी दोन वेळा पोलिसांवर दगडफेक केली. यावेळी पोलिसांनी काही ग्रामस्थांच्या मदतीने नातेवाईकांची समजूत काढली. त्यानंतर साडेआठ वाजेच्या सुमारास मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.