वराडजवळ बचत गटाची दोन लाखांची रक्कम चोरट्यांनी लुटली

0

पाळधी, ता. धरणगाव :- वराड गावातून बचत गटाची जमा केलेली दोन लाख रुपयांची रक्कम चोरट्यांनी लुटल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पवन मारग हे एका खासगी कंपनीत कामाला असून ते बचत गटांची रक्कम जमा करण्याचे काम करतात. ते आपल्या दुचाकी (एमएच- २१, बीएक्स-५२२७) ने वराड गावातून बचत गटाची रक्कम जमा करून ती भरण्यासाठी जळगाव येथे जात होते.

गावा बाहेरील शाळेजवळ तीन चोरटे स्पोर्ट बाईकवर आले व त्यांनी धक्का देवून मारग यांना खाली पाडले. तसेच दगडांनी मारून गाडीला लावलेली पैशांची बॅग हिसकावून पलायन केले. या बॅगेत बचत गटाचे २ लाख ३२ हजार रुपये होते. या घटनेची माहिती मिळताच पाळधी पोलिसांनी धाव घेऊन चोरट्यांचा शोध घेतला मात्र ते आढळून आले नाहीत. या बाबत पवन राजू मारग (रा. बारव पिंपळगाव, ह. मू. देवकर नगर, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.