७२ लाखांच्या डाळींचा अपहार केल्याप्रकरणी चालकावर गुन्हा

0

जळगाव : शहरातील एमआयडीसीतून डाळींचा ट्रेलर ऑस्ट्रेलियात पाठविण्यासाठी जळगावातून रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे जाण्यासाठी निघाला. परंतु ट्रेलर चालकाने २७ लाख रुपयांच्या डाळींची अफरातफर करुन – तो ट्रेलर रस्त्याच्या कडेला लावून चालक पसार झाल्याची घटना दि. ४ मे – रोजी उघडकीस आली. याप्रकरणी ७२ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी ट्रेल चालक राजसिंग अग्निदेवसिंग चौहान (रा. मरसराहा, सिधी, मध्यप्रदेश) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील महाबळ परिसरात तिलक रविंद्र काबरा हे वास्तव्यास असून त्यांची एमआयडीसीतील – सेक्टर एसमध्ये राधाक्रिष्ण अॅग्रो – इंड्रस्ट्रिज प्रायव्हेट लिमिटेड ही दालमिलची कंपनी आहे. ते कंपनीत डाळींवर प्रोसेसिंग करुन त्या संपूर्ण भारतासह विदेशात देखील त्याची विक्री करतात. ज्यावेळी विदेशातून दाळींना मागणी असते, त्यावेळी कंपनीतून डाळी या कंटेनरमध्ये भरुन त्या प्रिती लॉजिस्टीक सी. एफ एस. कलंबोली पनवेल जि. रायगड येथे पाठवतात. त्याठिकाणी या मालाची कस्टमद्वारे तपासणी होवून तो माल जहाजद्वारे विदेशात पाठविला जातो. काबरा यांना ऑस्ट्रेलियातून दाळीची ऑर्डर आल्यानंतर दि. २९ एप्रिल रोजी त्यांनी श्री. यश ओडीसी ट्रान्सपोर्टचे मालक गणेश मारुती उके यांच्याशी संपर्क साधून (डीडी ०१, एम ९४६५) क्रमांकाचे ट्रेलर बोलावून घेतले. ट्रेलरमध्ये माल भरल्यानंतर ट्रेलर चालक राजसिंग अग्निदेवसिंग चौहान हा पनवेल जाण्यासाठी निघाला.
ट्रेलर जळगावाहून पनवेल जाण्यासाठी निघाल्यानंतर दि. २ मे पर्यंत पोहचणे अपेक्षीत होते. त्यामुळे काबरा यांनी चालक राजासिंग चौहान याच्यासोबत संपर्क केला. परंतु त्याचा मोबाईल वारंवार बंदच येत होता. त्यामुळे काबरा यांनी ही माहिती ट्रान्सपोर्टचे मालक गणेश उके यांना कळवली. त्यांनी लागलीच ट्रेलरच्य मालक अनिल खेडकर यांच्याशी संपर्क साधून ट्रेलर पोहचला नसल्याचे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.